Saturday, 9 February 2013

कुठे हरवली माणुसकी??


कुठे हरवली माणुसकी??

वेळ बुधवारी सायंकाळी चार वाजून पंचावन्न मिनिटांची. ठिकाण शिये पुलाजवळ, रस्त्यालगत बैल पडलेला. बैलाला काय झालंय, असे विचारण्यासाठी मोटारसायकल थांबवली. तोवर बैलाचे दोन मालक तेथे आले. त्यांना विचारले असता म्हणाले, "गाडी हाकताना पडलाय. तो आता निकामी झालाय, उठणार नाही.'' "त्याला उठवायचा प्रयत्न करू,'' असे म्हटल्यावर दोघेही तेथून निघून गेले... आयुष्यभर ज्या बैलाच्या जीवावर पोट भरले, त्याच बैलाला मालकांनी तो जखमी झाल्यावर तेथून पळ काढला. कोठे गेली माणुसकी? याबाबत पांजरपोळ, महापालिकेत सांगण्याचा प्रयत्न केला; पण तेथून नकारघंटाच ऐकावी लागली.