Saturday, 9 February 2013

कुठे हरवली माणुसकी??


कुठे हरवली माणुसकी??

वेळ बुधवारी सायंकाळी चार वाजून पंचावन्न मिनिटांची. ठिकाण शिये पुलाजवळ, रस्त्यालगत बैल पडलेला. बैलाला काय झालंय, असे विचारण्यासाठी मोटारसायकल थांबवली. तोवर बैलाचे दोन मालक तेथे आले. त्यांना विचारले असता म्हणाले, "गाडी हाकताना पडलाय. तो आता निकामी झालाय, उठणार नाही.'' "त्याला उठवायचा प्रयत्न करू,'' असे म्हटल्यावर दोघेही तेथून निघून गेले... आयुष्यभर ज्या बैलाच्या जीवावर पोट भरले, त्याच बैलाला मालकांनी तो जखमी झाल्यावर तेथून पळ काढला. कोठे गेली माणुसकी? याबाबत पांजरपोळ, महापालिकेत सांगण्याचा प्रयत्न केला; पण तेथून नकारघंटाच ऐकावी लागली.


Saturday, 19 January 2013

आज पासून महाकुंभ मेळा सुरु झाला आहे .त्यासाठी हिमालयातून अनेक साधू आले आहेत .हे साधू दररोज आपले विविध असणे तयार करतात .हा कुंभ मेळा  १२ वर्षातून १ द येतो .त्यामुळे अनेक परकराचे साधू याला मोठ्या प्रमाणता हजेरी लावतात .सध्या  खूप थंडीची लाट आली असून हे साधू आपली भावना व्यक्त करतात .हा मेळा एप्रिल पर्यंत चालू राहणार आहे .तर या साधून कुंभ मेल्याच्या शुभेच्या .
maha sadu